देशासाठी अहोरात्र रस्त्यावर उभा असणाऱ्या पोलीस पित्याने व्हिडीओ कॉल द्वारे पाहिलं आपल्या परिचं पहिलं रूप

औरंगाबाद : जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 4 हजारापेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे बळींची संख्या 95 हजार 506 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत,जवळपास 11लाख 51 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 151 रुग्ण गंभीर आहेत.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 5865 वर पोहोचला आहे तर कोरोनोमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 477 लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक 1135 कोरोनाबाधित आहेत.

लॉकडाऊन मध्ये अनेक जण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालतंय कुटुंबाला एकत्र राहण्याची या पेक्षा चांगली संधी पुन्हा भेटणार नाही. मात्र ज्या कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी हा लोकडाऊन करण्यात आला आहे त्या कोरोनाशी डॉक्टर, पोलीस तसेच इतर कर्मचारी दोन हात करतायेत.

आपल्याला काही होऊ नाही म्हणून हे सगळे आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहे, अशातच औरंगाबादचे संदीप बोडखे मुंबई पोलीस दलात कार्यरत असतांना त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र अशा आनंदाच्या काळातही संदीप यांना आपल्या कुटुंबा सोबत राहता येत नाहीये याचे कारण म्हणजे ते कोरोना पासून लढा देण्या साठी मुंबईत कार्यरत आहे.

दोन वर्षांपूर्वीच संदीपचा विवाह झाला आहे. लोकडाऊनच्या काळात मानखुर्द मुंबई येथे कर्तव्यावर असतांना त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याची बातमी मिळाली हे कळताच त्यांनी व्हिडीओ कॉल द्वारे आपल्या मुलीला बघितले परंतु या सुखद काळात ते आपल्या कर्तव्यामुळे आपल्या कुटुंबासोबत उपस्थित राहू शकले नाही. तसेच अजून किती दिवस त्यांना आपल्या मुलीला प्रत्यक्षात बघता येणार नाही याची शाश्वती नसतांनाही त्यांच्या पत्नीला याचे अजिबात दुःख नाही उलट आपले पती देशासाठी अभिमानाचे काम करत असल्याचा त्यांनाही अभिमान आहे.