मुंबई: राज्यात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना अधिक पसरू नये म्हणून संचारबंदी, जमावबंदी तसेच शाळा महाविद्यालये देखील तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती.
राज्यात पुन्हा वाढणाऱ्या कोरोना बाबत ही बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी मंत्रिमंडळाला वरील बाबी सांगितल्या आहेत. तसेच राज्यात वैद्यकीय उपकरणांसह ऑक्सिजनच्या रोजच्या गरजेत वाढ झाली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात बोलताना म्हणाले, ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रिक टनांपर्यंत वाढल्यास कडक निर्बंध घालावे लागतील. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लसीकरणाला (Vaccination) गती देऊन आवश्यक ती पावले उचलावीत. पुढे ते म्हणाले की, पूर्णपणे लसीकरण झालेल्या करोना रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनची आवश्यकता नसते. परंतु लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- अनिल देशमुखांच्या शंभर कोटी बाबत पोलिस उपायुक्तांनीच दिले उत्तर, म्हणाले…
- कोरोनामुक्त होताच रोहित पवार मैदानात; साधला भाजपवर निशाणा
- ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनिल मेहता यांचे निधन
- “आपल्याला कोरोना झाला नाही कारण…”; इंदुरीकर महाराजांचे अजब विधान
- अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<