उद्धव ठाकरेंचे निवास ‘मातोश्री’ जवळील चहावाल्याला कोरोना; अंगरक्षक आणि कर्मचाऱ्यांची तातडीनं तापसणी

टीम महाराष्ट्र देशा –  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राहत असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाग्रस्त सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतचे वृत्त ABP माझा या मराठी वृत्त वाहिनीने दिलं आहे.

आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि व कार्यलयीन कर्मचाऱ्यांची तातडीनं तापसणी होणार आहे, तसेच त्यांचे अंगरक्षक आणि कार्यलयीन कर्मचारीही बदलले जाण्याची शक्यता आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या कर्मचाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. जवळपास १७० हून अधिक कर्मचारी या परिसरात कार्यरत असतात. या घटनेनंतर प्रशासनातील वरिष्ठ पातळींवरच्या हालचाली वाढल्या आहेत.

हेही पहा –