मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत.
गेल्या आठवड्याभरात राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. यानंतर, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन तर काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे. येत्या काही दिवसांसाठी आंदोलने, राज्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तर, येत्या काही दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पूर्वकल्पना देऊन लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात आज दिवसभरात ५२१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.४६ टक्के इतका झाला असून दिवसभरात ५०३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ५३१३ वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात काल ६९७१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती. कालच्या तुलनेत आज नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याने काहीसे दिलासादायक वृत्त समोर येत आहे. मात्र, संकट कायम असून नागरिकांनी काटेकोरपणे नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनातर्फे केलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांप्रमाणे महाविकास आघाडीने देखील पेट्रोल-डिझेलवर कर सवलत द्यावी – नवनीत राणा
- Breaking : पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोनाची लागण !
- शबनमला फाशी दिली तर अनर्थ ओढावेल; महंत परमहंसांचा इशारा
- मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त, पोलिसांचा मोठा निर्णय