चिंताजनक : ‘कोरोना’चा आठवा बळी; करोनाग्रस्तांचा आकडा ३२० वर

मुंबई : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. राज्यातील मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचलेला आहे.

तसेच मुंबईत 75 वर्षीय वृद्धाचा ‘कोरोना’मुळे बळी गेल्याची माहिती आहे, तर पालघरमध्येही 50 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्ताचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे करोना व्हायरसची साथ वेगानं पसरत असून महाराष्ट्रात करोनाग्रस्तांचा आकडा ३२० वर पोहोचला आहे.

देशभरातील २९ राज्यांत कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार बघता देशाच्या प्रत्येक भागात तपासणी केंद्रांची संख्या वाढविण्याचे आवाहन देशभरातील दोनशेहून अधिक शास्त्रज्ञांनी सरकारला केले आहे. कोविड-१९ संबंधित बातम्या आणि अद्ययावत माहिती देण्यासाठी माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने मंगळवारी एक टिष्ट्वटर हॅण्डल सुरू केले आहे.

दरम्यान, काल दिवसभरात 72 नव्या ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सर्वाधिक 59 रुग्ण आहेत, तर पुण्याचे 2, अहमदनगरचे 3, ठाण्याचे 2, कल्याण-डोंबिवलीचे 2, नवी मुंबईचे 2, तर वसई विरारचेही 2 रुग्ण आहेत.