#coronvirus : …तरीही कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता

corona

मुंबई : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनमधील कोरोनाग्रस्तांच्या दुप्पट झाली आहे. तर देशातील कोरोनाबळींचा आकडाही चीनपेक्षा जास्त झाला आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी एक लाख 60 हजारांच्या पार गेली.

जगभरात कोरोनाचा हाहाकार झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 59 लाखांवर गेली आहे. तर तब्बल 362,024 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चिंतेची बाब म्हणजे, वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसवर लस आली तरी कदाचित कोरोना पाठ सोडणार नाही अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ‘कोरोना व्हायरसवर लस आली तरी कदाचित कोरोना पाठ सोडणार नाही. तो आपल्यासोबत असाच कायम राहिल अशी शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, जगात आतापर्यंत कोरोनाने ३ लाख ५९ हजार ९७१ जण मरण पावले आहेत. सध्या २९ लाख ४४ रुग्ण उपचार घेत असून, २५ लाख ४१ हजार जण बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्यांपैकी २ टक्के रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आतातरी जागे व्हावे – थोरात

राज्यात आत्तापर्यंत १८ हजार ६१६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले, राजेश टोपेंची माहिती

उर्वरित शेतकरी कर्जमाफीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा…