#covid_19 : आतापर्यंत राज्यात 15 हजार 786 जणांनी केली ‘कोरोना’वर मात

corona

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची देखील संख्या वाढत आहे.

काल राज्यात दिवसभरात 1,186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 15 हजार 786 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 35 हजार 178 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच चिंताजनक बाब म्हणजे राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या आता 52 हजारांच्या पार गेली आहे. काल राज्यात नव्या 2 हजार 436 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52 हजार 667 वर पोहोचली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

केंद्राच्या पॅकेजला ‘आत्मनिर्भर’ हे केवळ गोंडस नाव, यातून दिलासा मिळणे अशक्य : चव्हाण

‘रिकाम्या खोक्यात भाजपची रिकामी डोकी भरून गुजरातच्या अंधार कोठड्या पाहायला पाठवायला हवे’

…तर आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल : WHOने दिला इशारा

केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यात दरमहा 1 हजार रुपये टाकावे : अर्थतज्ञ बॅनर्जी