कोरोना हे गेल्या १०० वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट – आरबीआय गव्हर्नर

shaktikant das

नवी दिल्ली :कोरोनाने भारतात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज काही लक्षणीय मुद्दे मांडले आहेत. ‘एसीबीय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्ह’ या आयोजित व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.  करोना हे गेल्या १०० वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी करोनामुळे परिणाम झालेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.

कोरोना व्हायरस मागील 100 वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट आहे, ज्यामुळं उत्पादन आणि नोकऱ्यांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळं जगभरात व्यवस्था, श्रम आणि कॅपिटल कोलमडलं आहे. त्यात देखील अर्थव्यवस्थेच्या वृद्धीलाच रिझर्व्ह बँकेचं प्राधान्य आहे. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत, असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.

दास म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक तंत्र सुरक्षित ठेवणे, सध्याच्या स्थितीमध्ये अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली. या संकटाच्या काळात भारतीय कंपन्या आणि उद्योगांनी चांगले काम केले आहे. लॉकडाऊनवरील निर्बंध हटवल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सामान्य स्थितीमध्ये परतत असल्याचे संकेत दिसत आहेत.

Latest News-

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून पुण्यात कलगीतुरा, बापटांनी अजित पवारांवर केली शेलक्या शब्दात टीका

पक्ष, राजकारण यापलिकडे जाऊन मनसेच्या ढाण्या वाघाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

महाराजांनी मनं जिंकलं : कोरोनातून बरे होताच दान केला प्लाझ्मा

‘पुढच्या वर्षी जनतेच्या मनातला, जनतेच्या मतातला मुख्यमंत्री पांडुरंगाची ‘विधीवत’ महापूजा करेल’