‘कोरोना म्हणजे बाबा रामदेव यांच्यासारखाच’, ड्रामा क्वीनचे बेधडक वक्तव्य

रामदेव बाबा

मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असते. यावेळी देखील तिच्या एका वक्तव्यामुळे तिची पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राखीने आता कोरोनाची तुलना योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी केली आहे.

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी म्हणते की, ‘अरे देवा, हा कोरोना आहे ना…कोरोना म्हणजे एकदम बाबा रामदेव यांच्यासारखा आहे. कोरोना कधी येतो, कधी लपतो तर कधी बाहेर निघून जातो,’ असे राखी म्हणाली. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

कोरोनाच्या या काळात राखीच्या अनेक व्हिडीओज सध्या मनोरंजक ठरत असून, राखी नेहमीच बिनधास्त आणि तिच्या विनोदी शैलीत उत्तर देताना दिसते. राखीच्या व्हिडीओची सध्या सोशल मिडियावर तूफान चर्चा होत असून अनेक लोकांना  तिच्या या वागण्याचे हसू येत आहे. याबाबत काहीजण सोशल मिडियावर भन्नाट कमेन्ट देखील करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP