कोरोना वाढतोय : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाला शरद पवार यांचा पाठींबा

sharad pawar

पुणे : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबंधित करून कोरोना नियमांचे कडक पालन करण्याचे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यभरात देखील नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, आंदोलन, यात्रा यांना राज्यात काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर, ‘पक्ष वाढवू, पण कोरोना नाही, पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू,’ असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना लगावला आहे.

यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरोनाची स्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस आपले सर्व दौरे रद्द केल्याचे जाहीर केलं आहे. ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.’ अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत ते नाशिकमधील विवाह सोहळ्यास तर पुण्यात देखील ते माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले होते. मात्र, आता छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने शरद पवार हे क्वारंटाईन होणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या