#Corona: कोरोनाची लागण झाल्याने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

corona

पश्चिम बंगाल : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊन मध्ये जात आहेत. कोरोना विरोधातील लढाईत पोलीस, डॉक्टर्स, नर्स, स्वछता कर्मचारी असे अनेकजण महत्त्वाची भूमिका निभावत आहे. अशीच कोरोना विरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पश्चिम बंगालमधील महिला अधिकाऱ्याचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

देवदत्ता रे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. हुगली जिल्ह्यातील चंदननगर उपविभागात उपदंडाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. ३८ वर्षीय देवदत्ता रे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर घरातच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. रविवारी त्यांची प्रकृती ढासळली असता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कोरोना विरोधातील लढाईत त्यांना अपय़श आलं आणि निधन झालं. त्यांच्या मागे पती आणि चार महिन्यांचा मुलगा आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील देवदत्ता रे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

देवदत्ता रे यांनी २०१० मधील बॅचच्या अधिकारी होत्या. चंदननगर येथे बदली होण्याआधी पुरुलिया येथे त्या गटविकास अधिकारी होत्या. देवदत्ता यांच्यावर ट्रेनमधून बंगालमध्ये परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांची जबाबदारी होती. बंगालमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवत ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली होती त्याचं सर्वांकडून कौतुक केलं जात होतं.

बापरे… देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ९ लाखांचा टप्पा

अभिनेत्री इशा केसकर ‘या’ कारणामुळे सोडतेय ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका

पुणे : नवनियुक्त महापालिका आयुक्तांसामोर कोरोना संकटाचे मोठे आव्हान