Share

IND vs SL | कोरोनाची वाढली भीती, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी BCCI ने जारी केली नवीन गाईडलाईन

IND vs SL | मुंबई: वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 (T-20) आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI) खेळली जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे BCCI ने नवीन गाईडलाईन जारी केली आहे. कारण देशासह मुंबईत देखील कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी पुन्हा आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 मालिकेचे तिकीट विक्री सुरू झाले आहे. या मालिकेचे तिकीट पेटीएम इनसाईटवर उपलब्ध आहे. दरम्यान, या मालिकेमध्ये प्रेक्षक आणि खेळाडूंचे कोरोना प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी काही नियम लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारत आणि श्रीलंका मालिकेदरम्यान प्रेक्षकांच्या संख्येवर कुठल्याही प्रकारची मर्यादा लादण्यात आलेली नाही. पण प्रेक्षकांसाठी मास्क घालणे अनिवार्य केल्या जाऊ शकते. त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्तींना आणि आजारग्रस्त असलेल्या लोकांना प्रवेश नाकारण्यात येऊ शकतो.

त्याचबरोबर क्रिकेटपटूंसाठी देखील बीसीसीआय जुने नियम लागू करू शकते. यामध्ये प्रेक्षकांच्या जवळ न जाणे, बाहेरील व्यक्तींना न भेटणे यांचा समावेश होऊ शकतो. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा सोशल डिस्टन्सचे नियम पाळा असे आवाहन देखील बीसीसीआयकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

IND vs SL | मुंबई: वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now