महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरूच ; आज सापडले तब्बल ‘इतके’ नवे रुग्ण

maharashtra corona

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात आज ८ हजार ७०२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३ हजार ७४४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २०१२३६७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६४ हजार २६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते संक्रमण हे आता केंद्र सरकारचीही चिंता वाढवत आहे. त्यामुळे तिथल्या कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी आता केंद्र सरकारनं धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी केंद्रानं उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्ये उच्च स्तरीय मल्टीडिसिप्लिनरी टीम रवाना करण्यात आली आहे. हे पथक राज्य सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करेल, आवश्यक ती पावलं उचलेल, अशी माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या