भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!

इस्लामाबाद : भारतातील कोरोना वाढीला तबलिगी कारणीभूत असल्याची भावना असतानाच आता पाकिस्तानमध्ये असलेली परिस्थिती समोर येत आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस दिल्लीतील मरकज येथे हजारो तबलिगी हे या धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. तसेच या कार्यक्रमाआधीच लॉक डाऊन असल्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. या कार्यक्रमातून अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यात भारतासह अनेक परदेशातील नागरिक यात अनधिकृतपणे देखील सामील झाल्याचे समजते. या कार्यक्रमानंतर हे सर्व विविध राज्यात परतल्याने या सर्वांना ट्रॅक करून क्वारंटाइन करण्याचे आवाहन निर्माण झाले होते.

पाकिस्तानमध्येही तबलिगींमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. पाकिस्तानमध्ये 20 हजार तबलिगींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात लाहोरमध्ये झालेल्या इस्लामिक बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने जमाती लोक धार्मिक मेळाव्यात गेले तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

तबलिगी जमात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची चौकशी किंवा अलग ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हा कार्यक्रम लाहोरमध्ये 10-12 मार्च दरम्यान झाला आणि तेव्हापासून पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये कोरोना (कोविड-19) पसरण्याची शक्यता वाढली आहे. या सभेला एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते दरम्यान, भारतात देखील शेकडो कोरोना पोजीटीव्ह तबलीगी आढळले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी सहकार्य न करता केलेल्या वर्तणुकीने देशभर संतापाची लाट पसरली होती.

पाकिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसने किमान अनेकजणांचा बळी घेतला आहे. परंतु अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे की कोरोनामुळे संक्रमित लोकांची संख्या जास्त आहे. त्याचवेळी पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती आणि असे प्रकार घडत आहेत हे मुस्लीम धार्मिक नेत्यांच्या आग्रहाचे परिणाम आहेत असा आरोप केला होता. त्याच वेळी आयोजकांनी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी धार्मिक सभा तहकूब केल्याचे सांगितले असल्याचे न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानुसार समजते.