कोरोनाचा उद्रेक, घाटीत गेल्या २४ तासात एकालाही डिस्चार्ज नाही

ghati aurangabad

औरंगाबाद : कोरोनाचे संकट संपता संपत नाही आहे. शहरात एकाच दिवसात कोरोनाचे २०० च्या वर रुग्ण कोरोनाग्र्स्त मिळाले आहे. शासनाकडून कडक अंबलबजावणी होत असतना, घाटीत मात्र, गेल्या २४ तासात एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही आहे. घाटीत बरे होणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. परंतु सध्या गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असल्यामुळे घाटी प्रशासन काळजी घेत आहे.

कोरोनाचा वेग मध्यंतरी चांगलाच मंदावला होता. त्यातच लस आल्याने सर्व सामान्याच्या मनात आशेचे किरण आले होते. परंतु अचानक महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेची सुरुवात दिसून आल्याने, प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. शहरात देखील आठवड्याभरात रुग्ण वाढीचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे शहरात देखील चिंतेची लाट पसरली आहे.

घाटी मध्ये सध्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. गंभीर रुग्ण जास्त प्रमाणात घाटीमध्ये दाखल करण्यात येत आहे. घाटी प्रशासनाने आत्ता पर्यंत ४३३८ रुग्णांवर उपचार केले असून, आत्ता पर्यंत २८२८ रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली तर सोमवारी घाटी मध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या