कोरोना इफेक्ट! औरंगाबादेत हायकोर्टाचे कामही आता ‘या’ पद्धतीने चालणार

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन अधिक गतीने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेनच्या निर्बंधाखाली शहरात एकप्रकारचे अघोषित लॉकडाऊनच लावण्यात आले आहे. आता जिल्हा न्यायालय देखील सकाळी ११ ते १ व दुपारी १:३० ते ३.३० असे चार तास सुरू राहील तर उच्च न्यायालयात दोन सत्रात ऑनलाईन सुरू राहणार असल्याचे वकील संघाच्या वतीने सांगण्यात आले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ब्रेक द चेन या नियमानुसार निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार आता औरंगाबाद न्यायालयाच्या देखील वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हा न्यायालय रोज सकाळी दोन तास व दुपारी दोन तास सुरू राहणार आहे. यामुळे वकिलांची तारांबळ तरी नाही होणार असे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विलास पाटणी यांनी सांगितले.

तर हायकोर्ट हे सकाळी १०.३० ते १:३० व दुपारी २:३० ते ४: ३० या दोन सत्रात कामकाज विभागले आहे. ऑनलाईन पध्दतीने हे कामकाज चालणार असून ज्यांच्याकडे ऑनलाईनची व्यवस्था नाही त्यांना हायकोर्टात देखील ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली असल्याचे हायकोर्ट बार असोसिएशनचे सचिव शहाजी गाटोळ पाटील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या