कोरोना इफेक्ट् : भारतात कंडोमच्या विक्रीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर प्रमुख मोठ्या शहरांमध्ये कडक बंद पाळण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने दिलेल्या या आदेशाचा अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. असे असतानाचा मेडिकल क्षेत्रातून एक अगळावेगळा रिपोर्ट समोर आला आहे. लॉकडाऊन झाल्यापासून कंडोमच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल 50% झाली असल्याच औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊन असल्यामुळे अनेकजण हे घरी आहेत. त्यामुळे प्रत्येकजण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवत आहे. अन्नधान्य, औषध, भाजीपाला आदि गोष्टींचा नागरिक साठा करून ठेवत आहेत. त्यात आता नागरिकांनी कंडोमच्या खरेदीलाही पसंती दिली आहे. अनेक मेडिकल स्टोअर्सच्या मालकांनी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोमची विक्री झाली नव्हती. मात्र आता दिवसाला कंडोमच्या विक्रीत 50% वाढ झाली आहे.

Loading...

“सामान्यपणे लोकं तीन कंडोमचे पाकीट घेण्याला प्राधान्य देतात. मात्र मागील आठवडाभरापासून अधिक संख्येने कंडोम असणाऱ्या मोठ्या पाकीटांची मागणी वाढली आहे. १० ते २० कंडोम असणाऱ्या पाकिटांचा खप मोठ्याप्रमाणात वाढला आहे,” असंमुंबईमधील औषध विक्रेत्याने सांगितले.

तर दुसऱ्या एका विक्रेत्याने अशापद्धतीने मागणी वाढणं चमत्कारीक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. “सामान्यपणे सणासुदीच्या काळात कंडोमची विक्री वाढल्याचे दिसून येते. खास करुन नवीन वर्षाच्या काळात कंडोमची विक्री वाढते. पण सध्या करोनाच्या भितीमुळे लोकं नेहमी लागणाऱ्या औषधांबरोबरच कंडोमचीही खरेदी करताना दिसत आहेत. मी माझ्याकडील कंडोमचा साठा २५ टक्क्यांनी वाढवला असल्याचं,” एका औषध विक्रेत्याने सांगितलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात