कोरोनाच काउंटडाऊन सुरु ! सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लस वितरणाला सुरुवात

सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड

पुणे: कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या वर्षाच्या सुरुवातीलाच या दोन्ही लशींना मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणाला कधी सुरुवात होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

त्यानंतर आज अखेर तो ऐतिहासिक दिवस उजेडाला आहे ज्याची गेल्या वर्षभरापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनरपैकी तीन कंटेनर पुणे विमानतळाच्या दिशेने पोलिस बंदोबस्तामध्ये 4 वाजून 55 मिनिटांनी रवाना झाले आहेत. यावेळी या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते कंटेनरची पूजा करण्यात आली.

यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले कि, ‘कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच पोलिसांच्या सुरक्षेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून रवाना झाली आहे.’पुणे एअरपोर्टहून वॅक्सिनच्या एअर ट्रान्सपोर्टची जबाबदारी सांभाळणारी कंपनी एसबी लॉजिस्टिकचे एमडी संदीप भोसले यांनी सांगितले की, एकूण आठ फ्लाइट्स कोविशील्ड लस पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशातील 13 ठिकाणी पोहोचवली जाणार आहे. पहिली तुकडी दिल्ली विमानतळासाठी रवाना करण्यात आली आहे.

आज रवाना करण्यात आलेल्या या कंटेनर पैकी पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी 8 वाजता रवाना होणार आहे. 8 फ्लाईटपैकी 2 फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गोवाहाटी येथे जाणार आहे. पुणे विमानतळावरून कोविशील्ड लसीचे देशभरातील 13 शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या भागात जाणार आहेदेशात प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या