#corona : राज्यात कोरोनाबाधितांनी गाठला 50 हजाराचा आकडा ! 3041 रुग्णांची नव्याने भर 

corona

मुंबई : राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 50 हजारच्या घरात पोहचली आहे. तर आज दिवसभरात नव्याने 3041 जणांची भर पडली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 33988 एवढी आहे, असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, रविवारी 3041 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 50 हजार 231 इतकी झाली आहे. त्याचबरोबर दिवसभरात 1196 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 व्यक्ती करोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 33988 इतकी आहे.

दरम्यान राज्यात मुंबईमध्ये कोरोनाबधितांची संख्या सर्वाधिक आहे. तर धारावीत दिवसभरात 27 नवीन रुग्ण आढळून आले. तर दोन जणांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. धारावीतील एकून करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1541 झाली आहे. मुंबईतील कोरोनाबधितांची संख्या ही सध्या 30542 एवढी आहे. तर त्यापैकी 374 जण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र 988 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

धक्कादायक : महाराष्ट्राच्या अजून एका मोठ्या मंत्र्याला कोरोनाची लागण

सीमेवर कोरोना रोखणा-या सरपंच उपसरपंच पोलिस पाटलांचा प्रमाण पञ देवुन सन्मान

‘केंद्राकडून पॅकेज देण्यात आलेलं पॅकेज उघडलं, तर तो फक्त रिकामा खोका निघाला’