#corona : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना सक्रीय, एकूण रुग्णसंख्या 35 वर

corona

तुळजापूर – उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शनिवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत उस्मानाबाद जिल्हयातील 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 35 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 06 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत., अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आज सहा पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी उस्मानाबाद शहरातील दोन रुग्ण असून त्यातील एक रुग्ण देशपांडे स्टॅन्ड जोशी गल्ली येथील असून तो सोलापूर येथून आलेला आहे. तर दुसरा रुग्ण धुता तालुका उस्मानाबाद येथील तीस वर्षे महिला असून ती मुंबई येथून प्रवास करून आलेली आहे.

उमरगा तालुक्यातील तीन पॉझिटिव्ह रुग्ण असून यामध्ये उमरगा शहरातील दोन रुग्ण आहेत व ते पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेले होते तर एक उमरगा तालुक्यातील कासार जवळगा या गावातील रुग्ण आहे. तो मुंबईतून प्रवास करून आलेला आहे. तर सहावा पॉझिटिव्ह रुग्ण हा परंडा तालुक्यातील कुकडगाव येथील आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 35 इतकी झाली असून त्यातील उपचार घेत असलेले रुग्णांची संख्या 29 इतकी आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 50 हजारच्या घरात पोहचली आहे. तर काल दिवसभरात नव्याने 3041 जणांची भर पडली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 33988 एवढी आहे, असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

#corona : राज्य आणि रेल्वेची जुंपली, CM ठाकरेंच्या आरोपावर गोयलांचे रात्री 2 वाजेपर्यंत ट्विट…

#Corona : परीक्षेसाठी एवढी लुडबूड का ? शिवसेनेने घेतला राज्यपालांचा समाचार

#corona : राज्यात कोरोनाबाधितांनी गाठला 50 हजाराचा आकडा ! 3041 रुग्णांची नव्याने भर