धारावीतील कोरोना नियंत्रण हे केवळ RSS आणि अन्य संस्थांमुळे, नितेश राणेंचा दावा

nitesh rane

मुंबई: कोरोनाने देशासह महाराष्ट्र राज्यातील कहर हा सुरूच ठेवला आहे. तर यामुळे, राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊन मध्ये जात आहेत. या परिस्थितीत एक सुखद घटना म्हणजे, धारावी या सर्वात मोठ्या हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा आता आटोक्यात आला आहे.

धारावीतील कोरोना रुग्णसंख्येवरील नियंत्रणाची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घेतल्यानंतर, आता श्रेयवाद सुरु झाला आहे. धारावीतील रुग्णसंख्या ही महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आली असल्याचा दावा, भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. WHO ने उगाचच याचं श्रेय राज्य सरकारला देऊ नये, असं देखील राणे म्हणाले.

कोरोना हे गेल्या १०० वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट – आरबीआय गव्हर्नर

नितेश राणे ट्विट मध्ये म्हणतात, ‘आरएसएस आणि अन्य समाजसेवी संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनतर करुन मदत केली, तिथल्या लोकांची जनजागृती केली. धारावी कोरोना रुग्ण घटण्याचं एकमेव कारण म्हणजे RSS आणि अन्य संस्था आहेत. महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही. WHO ने उगाचचं याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा खरं ज्यांनी मेहनत केली आहे, त्यांना दिलं असतं तर समाधान वाटलं असतं.’ त्यामुळे यावर आता राजकीय श्रेयवाद चांगलाच रंगणार असल्याचे नाकारू शकत नाही.

दरम्यान,  संयुक्त राष्ट्रांचे आरोग्य प्रमुख म्हणाले की, मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. डब्ल्यूएचओ महासंचालकांनी धारावी मॉडेलचं कौतुक करताना नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता यावर जोर दिला. ते म्हणाले, ज्या देशांमध्ये वेगवान विकास आहे, तेथील निर्बंध कमी होत आहेत आणि आता प्रकरणे वाढू लागली आहेत. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता ठेवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी ट्रेडोस अधॅनम गेब्रेयसेन यांनी नमूद केलं.

तर, शुक्रवारी मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत फक्त १२ नवे रुग्ण सापडले आहेत.  कोरोनाच्या नवीन रुग्णांची एकूण संख्या काल २,३५९ ने वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या अधिका-याने ही माहिती दिली. नागरी संस्थेने गेल्या काही दिवसांपासून कोरोनामधील मृत्यूची नोंद करणे बंद केले आहे. या अधिका-याने सांगितले की सध्या धारावी येथे  १६६ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १,९५२ रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून, अडीच चौरस किलोमीटर क्षेत्रात ती पसरली आहे, जेथे जवळपास ६.५ लाख लोक राहतात.

‘राजकीय हितासाठी कॉपी बहाद्दर सरकारचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ,विद्यार्थ्यांच्या आरोग्य काळजीचे दावे खोटे’