#corona: चिंता वाढली; भारतात सलग दुसऱ्या दिवशी २८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

corona

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. भारतात गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासात २८ हजार ७०१ नवे रुग्ण सापडले असून ५०० जणांच मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील कोरोना बाधित रुग्णसंख्या ८ लाख ७८ हजार २५४ वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे कि, देशात सोमवारी (13 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 8 लाख 78 हजार 254 कोरोनाबाधित समोर आले आहेत. यापैकी सध्या 3 लाख 01 हजार 609 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर 5 लाख 53 हजार 470 एवढे रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 23 हजार 174 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असला तरी दुसरीकडे रिकव्हरी रेटही वाढत असल्याचे दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 5.53 लाखहून अधिक लोक बरे झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 850 लोक बरे झाले आहेत. ताज्या आंकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तब्बल 63 टक्क्यांहून अधिक लोक बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या ७,८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ५४ हजार झाली आहे. अवघ्या सहा दिवसांमध्ये राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ५० हजाराने वाढली. गेल्या २४ तासांत राज्यात १७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ही १०,२८९ झाली.

महाराष्ट्रात होणार जगातील सर्वांत मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल

कोरोनाचा हाहाकार; देशात 5 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित, जाणून घ्या राज्याची स्थिती

१०६ वर्षांच्या आजोबांनी करून दाखवलं, कोरोनाला चारीमुंड्या चीत करत झाले ठणठणीत बरे