कोरोनामुळे महिला आयपीएल स्पर्धाही स्थगित; मात्र ‘या’ स्पर्धेत खेळण्याची मिळाली संमती

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे अनेक खेळाडू मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत.

आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने उर्वरीत स्पर्धा रद्द तर झालीच मात्र येत्या २३ मे पासुन सुरु होणारी महिला आयपीएल स्पर्धाही रद्द झाली. महिला आयपीएल स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. मात्र ही स्पर्धा जरी रद्द झाली असली तरी ब्रिटनमध्ये होणाऱ्या ‘हंड्रेड’ स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्म्रिती मंधना आणि दिप्ती शर्मा या तीन खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहे.

‘हंड्रेड’ ही १०० चेंडूची स्पर्धा २१ जुलै २०२१ पासून सुरू होणार आहे. तसेच जुन महिन्यात भारतीय महिला संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना हा १६ जुन रोजी होणार आहे. तर कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघात ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या