इच्छाशक्ती समोर कोरोनाही झुकतो; डॉक्टरांनीही आशा सोडलेल्या ९३ वर्षीय आजोबांनी जिंकून दाखवलं !

कराड : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या थैमानामुळे चिंताजनक वातावरणातही काही दिलासादायक व सकारात्मक असे वृत्त समोर येत आहेत.

प्रबळ इच्छाशक्तीने नव्वदी पार केलेले वृद्ध देखील कोरोनावर मात करत आहेत. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर घाबरून जाण्यापेक्षा सकारात्मक विचार, योग्य उपचार व खबरदारी घेणं गरजेचं असल्याची समज आपल्या सर्वांना मिळत आहे. आता डॉक्टरांनीही आशा सोडलेल्या ९३ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील ९३ वर्षीय बाबूराव सुतार यांनी कोरोना झाल्यानंतर घाबरून आशा सोडणाऱ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण करून दिला आहे. कोयना कृषक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनाने सहकार महर्षी पुरस्काराने सन्मानित केलेले बाबुराव कृष्णाजी सुतार उर्फ आण्णा यांनी कोरोनाला हरवलं आहे.

त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्तरांनी त्यांना दवाखान्यात ऍडमिट न करता घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यांचं आयुष्य काही दिवसांचं असून त्यांना खाऊपिऊ घाला. या वयात उपचारांचा काही उपयोग होणार नाही, असा सल्ला दिला होता. मात्र, बाबूराव सुतार यांची प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन आणि घरच्यांनी केलेल्या सेवेमुळे कोरोनाला चितपट केलं आहे. कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने फोनवरुन तसेच इतर माहिती घेऊन शक्य ते अनेक उपचार केले, असं देखील त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP