कोरोना अलर्ट! नांदेड जिल्ह्यात १४५० नवे बाधीत, २६ जणांचा मृत्यू

नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे यंत्रणेसमोर मोठे आवाहन ठाकले आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या ५ हजार २६३ अहवालापैकी १ हजार ४५० अहवाल कोरोना बाधीत आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६८६ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७६४ अहवाल बाधीत आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ५२ हजार ३४२ झाली असून यातील ४० हजार ११८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. आजघडीला १० हजार ९७९ रुग्ण उपचार घेत असून १८९ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे.

४ ते ७ एप्रिलदरम्यान कोरोनाने २६ जण दगावले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९९६ झाली आहे. ४ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे भोसतील ४१ वर्षाचा पुरुष, एस.पी. ऑफिस परिसर नांदेड येथील ५५ वर्षाची महिला, तथागत नगर येथील ६५ वर्षाची महिला, पांडूरंग नगर येथील ५२ वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालय येथे वरवंट ता. कंधार येथील ५९ वर्षाचा पुरुष, दिनांक ५ एप्रिल रोजी तिरुमला कोविड रुग्णालय येथील सोमेश कॉलनी येथील ७८ वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पांगरगाव ता. मुदखेड येथील ५५ वषाची महिला, गाडीपुरा येथील ५५ वर्षाची महिला, हडको नांदेड येथील ७५ वर्षाची महिला, तथागत नगर येथील ७० वर्षाचा पुरुष, बळीरामपूर येथील ६० वर्षाचा पुरुष, लहान ता. अर्धापूर येथील ४५ वर्षाचा पुरुष, कोलंबी ता. नायगाव येथील ६१ वर्षाचा पुरुष, दिनांक ६ एप्रिल रोजी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे सिडको येथील ७२ वर्षाचा पुरुष, आनंदनगर नांदेड येथील ७७ वर्षाचा पुरुष दगावले असल्याची माहिती मिळत आहे.

दिनांक ७ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे तरोडा नांदेड ७४ वर्षाचा पुरुष, ५० वर्षाची महिला, श्रीनगर नांदेड येथील ७३ वर्षाचा पुरुष, खाजाकॉलनी नांदेड येथील ६० वर्षाची महिला, कलालगल्ली येथील ७१ वर्षाचा पुरुष, मरळक येथील ६१ वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे कामारी ता. हिमायतनगर येथील ७० वर्षाची महिला, पारवा ता. हदगाव येथील ६२ वर्षाची महिला, जुना सराफा देगलूर येथील ८४ वर्षाची महिला, तिरुमला कोविड रुग्णालय येथे पुयनी येथील ७० वर्षाचा पुरुष मरण पावले आहेत. कोरोना बळींची संख्या २६ आहे. गुरुवारी १२२७ जणांना सुटी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :