कोरोनाचा आफ्रिदीच्या डोक्यावर झाला परिणाम? म्हणाला, अजमलच्या गोलंदाजीला सचिन घाबरायचा

blank

कराची : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा शरीरावर परिणाम होतो हे ऐकले होते पण नुकतेच त्याने केलेलं वक्तव्य ऐकून कोरोनाचा आफ्रिदीच्या डोक्यावर झाला परिणाम झाला आहे की काय असा सवाल उपस्थित झाला आहे.

शाहीद आफ्रिदीची बेताल वक्तव्ये सुरुच आहेत. त्याची वक्तव्य ही वेडेपणाचा झटका आल्यासारखीच असतात. काही दिवसांपूर्वीच त्याने भारतीय संघ पराभवानंतर माफी मागायचा, अशी निर्थक बडबड केली होती. त्यानंतर आता क्रिकेटच्या मैदानात अशक्यप्राय विक्रम नोंदवून विक्रमादित्य ठरलेल्या सचिनसंदर्भात बोलताना अजब दावा केला आहे.

शाहिद आफ्रिदी हा भारतविरोधी वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. अनेकदा सोशल मीडियावर त्याला आपल्या या सवयीमुळे टीकेचा सामना करावा लागला आहे. शाहिदने भारतीय संघाची आणखी एक खोडी काढताना, सचिन तेंडुलकर, शोएब अख्तर आणि सईद अजमल या गोलंदाजांचा सामना करताना घाबरायचा असं म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी शाहिदने एका मुलाखतीत, पाकिस्तानी संघाने भारताला इतक्यांदा हरवलं आहे की सामना संपल्यानंतर आम्हालाच दया यायची आणि आम्ही त्यांची माफी मागायचो असा अजब दावा केला होत्ता.

यापूर्वी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून त्याने सचिन अख्तरला घाबरतो, असा उल्लेख केला होता. शोएब अख्तरच्या काही स्पेल अशा असायच्या की सचिन नाही तर जगातील सर्वच फलंदाज घाबरत, असेही त्याने यावेळी मुलाखतीमध्ये म्हटले आहे. आता आफ्रिदीने सचिन सईद अजमलच्या गोलंदाजीलाही घाबरत होता, असे हस्यासपद वक्तव्यही त्याने यावेळी केलय.

लोक राजकारण्यांवर फक्त थुंकायचे बाकी राहिलेत – निलेश राणे

“फील्डवर छान काम करताय पण आता काळजी घ्या”, पुण्याच्या महापौरांना मुख्यमंत्र्यांचा फोन

राजगृहावरील हल्ल्याचा मनसेकडून निषेध; ‘आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला’