कोरोना ; केंद्राचे दोन सदस्यीय पथकाने केली परभणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

परभणी : केंद्राचे पथक परभणीत दाखल झाले आहे. तर प्राथमिक माहिती पथकातील दोन्ही सदस्यांनी घेतली आहे. पथक शुक्रवारी  कोविड सेंटरला भेटी देणार आहे. हे पथक पुढील तीन दिवस परभणी जिल्ह्यात असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी   दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड, व्हॅक्सीनेशन सेंटरला भेटी देण्यासह सद्यपरिस्थितीचा अभ्यास करून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल केंद्रास सादर करण्यासाठी दोन सदस्यीय पथक गुरुवारी दुपारी परभणीत दाखल झाले आहे.
दोन सदस्यीय पथकात पाँडेचेरी येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ. दिनेश बाबू व नागपूर येथील असोसिएट प्रोफेसर श्रीमती डॉ. रंजन सोळंकी यांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापुर्वीच्या कोरोनापेक्षाही यावेळी मोठी गंभीर परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सर्वतोपरी उपाययोजना करत कोरोनाची ही साखळी तोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणारी व जाणारी प्रवाशी वाहतुक यापुर्वीच बंद केली आहे.
 राज्य सरकारच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलेत. या शिवाय कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत जिल्हा शासकीय रुग्णालयासह आयटीआय, जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील कोविड सेंटरमध्ये सर्व साहित्य उपलब्ध करीत रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत, या दृष्टीने स्वतः जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी लक्ष घालून सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शुक्रवारी हे पथक शहरासह जिल्ह्यातील कोविड सेंटरसह व्हिक्सीनेशन सेंटरलाही भेटी देणार आहेत. कोविड सेंटरमधील सोयीसुविधांबाबत माहिती घेणार आहे, तेथील सर्व यंत्रणेची पाहणी करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :