महाविकास आघाडीत केवळ भ्रष्टाचार आणि अनैतिक कामांसाठी समन्वय; भाजप नेत्याची टीका

bjp vs aghadi

कोल्हापूर : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याची टीका भाजप नेते करत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला मोठा धक्का बसणार असून याला आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत आज भाजपने १ हजार ठिकाणी आक्रमक निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

संपूर्ण राज्यभरात भाजपच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात देखील भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. महाविकास आघाडीविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण रद्द झालं असा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारमधील मंत्र्यांमध्ये विकास कामांसाठी समन्वय नाही मात्र भ्रष्टाचार आणि अनैतिक कामांसाठी समन्वय असल्याची खोचक टीका यावेळी भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात

नागपुरातील मानेवाडा चौकात आंदोलन करत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या दिला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ओबीसींचं आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना आणि परवानगी न घेता केलेल्या या आंदोलनामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्त्वाच्या बातम्या