fbpx

सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा बंगला अनधिकृतच; उच्च न्यायालयात अहवाल देत आयुक्त रजेवर

subhash deshmukh1

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा बंगला अवैध असल्याचा स्पष्ट अहवाल सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाला हा अहवाल सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या अहवालामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे. तर आहवाल सादर करताच आयुक्त ढाकणे रजेवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सुभाष देशमुखांनी अग्निशमन दलासाठी आरक्षित जागेवर बंगला बांधल्याचा आरोप करण्यात आला होता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाला याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, आपला बंगला अधिकृत जागेतच बांधल्याचा दावा देशमुख यांनी केला होता.

सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बेकायदा बांधकाम विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती. आरक्षित जागेवर नियमबाह्य आणि बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका सुभाष देशमुखांवर ठेवण्यात आला आहे. अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुभाष देशमुखांनी आलिशान बंगला बांधल्याचं समोर आल आहे.