6 महिन्यामध्ये इस्लाम कबूल करा अन्यथा छाटले जातील हात-पाय

k p ramanunni

वेबटीम/तिरुवनंतपुरम्-  मुस्लिम तरुणांना आपल्या लेखांच्या माध्यमातून भटकवत असल्याचा आरोप करत प्रख्यात लेखक के.पी.रमनउन्नी यांना धमकवण्यात आलं आहे . 6 महिन्यामध्ये रमनउन्नी यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा अन्यथा त्यांचा डावा हात आणि उजवा पाय कापून टाकला जाईल अशी धमकी निनावी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

रमनउन्नी यांना सहा दिवसांपूर्वी कोझिकोड स्थित घरात मिळालेल्या या पत्रा विषयी त्यांनी पोलिसंमध्ये तक्रार नोंदवलेली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.  एनडीटीव्ही ला  दिलेल्या मुलाखतीत  रमनउन्नी म्हणतात. या सगळ्या प्रकारच्या मागे कोण आहे हे सांगणं अवघड आहे मात्र मलप्पुरम् जिल्ह्यामधील मंजिरी नावाच्या गावामधून हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे.

प्रथम तर मी या पत्राकडे दुर्लक्ष केलं होतं पण वरिष्ठ लेखकांच्या सांगन्याहून मी कोझिकोड पोलिस कमिश्नरांच्या जवळ तक्रार दाखल केलेली आहे. आणि गुन्हेगारांना अटक करावी अशी विनंती केली आहे  त्या पत्रा मध्ये असा सुद्धा उल्लेख केला आहे की, जर आमचं ऐकलं नाही तर त्यांची अवस्था प्रोफेसर टी जे जोसेफ यांच्या सारखी केली जाईल.

2010 मध्ये प्रोफेसर जोसेफ यांचा डावा हाथ एका कट्टरपंथी मुस्लिम संघटनेच्या एका कार्यकर्त्या कडून कापण्यात आला होता.  त्याच म्हणणं अस होत की, प्रोफेसरांनी प्रश्नपत्रिका सेट करताना त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. आता रमनउन्नी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे.

के.पी.रमनउन्नी यांचा अल्पपरिचय

मल्याळम भाषेत विपुल लेखन ,

कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध

अनेक लघुकथा प्रसिद्ध आहेत

केरळ साहित्य अकादमी,वालायर  आदी पुरस्कार प्राप्त