अधिवेशन आणि संमेलन वादाशिवाय पार पडत नाही : मुख्यमंत्री

cm in sahitya samelln

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय नेते व साहित्यकांचे चिमटे काढत विधिमंडळाची अधिवेशने असो कि साहित्य संमेलने हि गोंधळाशिवाय पूर्ण होत नाही. गोंधळ व वादामध्ये राजकीय नेते व साहित्यिकांच्या यत्तेमध्ये फरक नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचविले. विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते.

Loading...

विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून वाद निर्माण झाला होता. ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी विदर्भ साहित्य संघाने निवड केली होती. काही दिवसांनीच त्यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हा सगळा वाद पाहता मुख्यमंत्र्यांनी या वादाची थेट ज्याच्या अधिवेशनाशी तुलना करत राजकीय नेते व साहित्यिकांना फटकारले. मुख्यमंत्री म्हणाले, विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरूवातीला गोंधळ किंवा वाद झाल्याशिवाय पुढील अधिवेशन सुरळीत पार पडत नाही. त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य संमेलन असो वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो, वादाशिवाय सुरळीत पार पडत नाही, हे यावर्षीही सिद्ध झाले. या गोंधळाशिवाय नेते व साहित्यिकांच्या संमेनाला पूर्णत्वच येत नाही.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...