उस्मानाबादकरांसाठी खुशखबर : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजूर

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

या मार्गामुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भावि कांची मोठी सोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे 2018-19च्या नियोजनात नव्या रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला आहे.सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या या 80 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

काँग्रेस देणार मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस

अंजलीसे खट्टी-मिठी बाते करो, दामानिंयाना अश्लील फोन