तानाजी चित्रपटातील ‘तो’ आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा ‘तान्हाजीः द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सर्वत्र जोरदारपणे सुरु असलेल्या तानाजी चित्रपटावरून सुरु असलेले वादही होत असल्याचे समोर येत आहे.

‘तान्हाजीः द अनसंग वॉरियर’ या सिनेमातील काही मुद्द्यांवर नाभिक समाजाने आक्षेप घेतला आहे. नाभिक समाजाचे पात्र चुकीचे दाखविल्याने समाजबाबत चेष्टेची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे समाज बांधवांच्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. भावना दुखावत असल्याने तानाजी चित्रपटातील नाभिक समाजविषयीचा हा वगळावा अशी मागणी पुणे जिल्हा नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे युवाध्यक्ष निलेश पांडे यांनी दिली.

Loading...

हिंदवी स्वराजाच्या निर्मितीतील शिवरक्षक जिवाजी महाले, शूरवीर शिवाजी काशीद यांचे शौर्य आणि बलिदान इतिहासाला माहित आहे, नाभिक समाज हा शौर्याचे प्रतीक आहे. तानाजी या चित्रपटात नाभिक समाजाचे पात्र चुकीचे दाखविले आहे, या पात्राबाबत इतिहासात कोठे ही माहिती नाही. हे पात्र काल्पनिक दाखवून लाचार, दीन व खबरी असे चुकीचे पात्र दाखविल्याने तमाम नाभिक समाज बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रकारामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. या चित्रपटातील नाभिक समाजाच्या पात्राच्या चुकीच्या भूमिकेमुळे नाभिक समाजाच्या पिढीने कोणता बोध घ्यावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत शासनाने लक्ष घालून तानाजी चित्रपटातील हा समाजावरील अन्यायकारक भाग वगळावा, अशी मागणी पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे युवाध्यक्ष निलेश पांडे, पुणे शहर संघटनेचे अध्यक्ष महेश सांगळे यांनी सांगितले. भविष्यात ही सिनेमा, नाटक, मालिका व जाहिरातीमध्ये नाभिक समाजाविषयी व्यंग दाखवून बदनामीचा प्रकार केल्यास सेन्सॉर बोर्ड, सिनेमा, नाटक, मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक कायदेशीर कारवाईला जवाबदार राहतील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान,दुसऱ्या बाजूला याच दृष्यांना मॉर्फिंग (morphing) करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक व्हिडिओ पाॅलिटिकल कीडा (political kida) नावाच्या ट्विटर हँडलवरून (twitter handle) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार छत्रपती संभाजी संतापले आहेत. भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'