‘इतका कडक गांजा देशात आला कुठून’ आदित्य ठाकरेंच्या संदर्भातील मिम्सवरून वाद

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीच्या काळात प्रचारचा स्तर अनेकदा खालवताना दिसतो. तसेच सोशल मिडीयावर देखील प्रतिस्पर्धी उमेदवाराला ट्रोल करण्यासाठी अनेक मिम्स वापरले जातात. असाचं आदित्य ठाकरेंच्या संदर्भातील एक मिम्स सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यावर निवडणूक आयोगाने वेळीच दखल घेत सबंधित उमेदवाराला याबाबत नोटीस बजावली आहे.

प्रशांत गंगावणे असं या उमेदवाराचं नाव असून ते हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आरे प्रकारणावर पोस्ट करताना गंगावणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर एक मेमे तयार केला आहे. यामध्ये आरे प्रकारणावर पोस्ट करताना गंगावणे यांनी आदित्य ठाकरे यांचा धूर काढताना फोटो तयार करून ‘इतका कडक गांजा देशात आला कुठून’ असा उल्लेख केला आहे.यावरून निवडणूक आयोगाने प्रशांत गंगावणे यांना आचारसंहिता भंग केल्याची नोटीस बजावली आहे.

दरम्यान ‘आरे’ कॉलिनीतील वृक्षतोडी हा सध्याचा ज्वलंत मुद्दा आहे. यावरून शिवसेनेने प्रशासना विरुद्ध भूमिका घेतली आहे. मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी ‘आरे’ मधील 2646 वृक्ष तोडीचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. मात्र या प्रस्तावाला मुंबईच्या नागरिकांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. तसेच शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तर आदित्य ठाकरे यांनी रात्रीच्या अंधारात झाडे तोडल्याच्या घटनेवरून नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती.

महत्वाच्या बातम्या