गाडीवर दगडं पडताच खोतांना आठवली जात; सोशल मिडीयावर संतापाची लाट

टीम महाराष्ट्र देशा: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यामध्ये त्यांच्या ताफ्यातील एका गाडीच्या काचा फुटल्या. तर यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी गाजरे, मका कणसे गाडीवर फेकत त्यांचा निषेध केला. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी ‘आपण बहुजन समाजातील नेता असून कोणाला घाबरणार नसल्याचे’ सांगितले तर त्यांचा मुलगा सागर खोत यांनी ‘सुरुवात शेट्टी ने केलीय याचा शेवट आम्ही करू…एक मराठा लाख मराठा’ अशी फेसबूक पोस्‍ट करून नवा वाद निर्माण केला आहे.

सागर खोत यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनंतर अनेक नेटीझन्‍सकडून त्यांचा निषेध करण्यात आला. ‘तुमच्या दोघांची भांडणे आहेत तुम्‍हीच सोडवा, शेट्टी – खोत वादाला समाजाचा संबंध का जोडता’ असा सवाल यावेळी उपस्‍थित करण्यात आला आहे. तसेच सागर खोत यांच्या पोस्टचा समाजातील सर्वस्‍तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

सागर खोत यांची फेसबुक पोस्ट

sagar khot fb post

काय म्हणाले सदाभाऊ खोत?
माझ्यावर व्यक्तिद्वेषातून हल्ला करण्यात आला. पाया खालची वाळू सरखल्याने माझ्या गाडीवर हल्ला केला आहे असं खोत म्हणाले. अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याला मी घाबरणार नाही. मी हल्ल्याचा धिक्कार करतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरणार नाही

नेमक काय घडल
सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कुर्डूवाडी येथील टोल नाक्यावरून बार्शीच्या दिशेने जात असताना, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर शेतातील गाजरे, मक्याची कणसे फेकून मारण्यात आली. यामध्ये सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान झालं आहे.Loading…
Loading...