सभा रामदास आठवलेंची, विजयाच्या घोषणा प्रकाश आंबेडकरांच्या नावाच्या

रामदास आठवले

औरंगाबाद: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दलित कार्यकर्त्यांच्या रोषाला समोर जाव लाग आहे.

आठवले यांचा कार्यक्रम सुरु होताच समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. रामदास आठवले यांच्या भाषणा दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने त्यांनी अवघ्या 7 मिनिटात भाषण उरकले. यावेळी कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो अशी घोषणाबाजी करत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना आठवले यांनी पुन्हा एकदा दलित ऐक्याचा नारा दिला आहे. ते म्हणाले कि ‘दलित ऐक्यासाठी सर्वात आधी ‘पॅंथर’बरखास्त करणारा मी कार्यकर्ता आहे. आपण कायमच घेतली आहे. पण एका दिवसासाठी मंचावर येऊन ऐक्य होणार नाही त्यासाठी आधी ऐक्याचा फॉर्म्यूला तयार करावा लागणार आहे. मात्र ऐक्यामुळे माझ्या मंत्रिपदावर गदा येत असेल तर मला ते ऐक्य मान्य नसल्याच खळबळजनक विधान देखील यावेळी त्यांनी केले.