इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर कंगना-पठाणमध्ये सुरु झाला वाद, म्हणाले…

कंगना-पठाण

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेकदा तिच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींच्या निकालावर देखील कंगना रनौत ट्विटरवर वाद निर्माण होईल असे बोलली त्यामुळे ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले होते. त्यांनतर कंगना इंस्टाग्राम अकाउंटवर सक्रिय झाली. कंगनाने सोशल मीडियावर इस्रायलचे समर्थन केले. दरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने कंगनाला या विषयावर खडे बोल सुनावले आहेत.

नुकताच इरफानने पॅलेस्टाईनला आपला पाठिंबा दर्शवत एक पोस्ट केली. कागिसो रबाडा यांचे ट्विट त्याने पुन्हा रिट्विट केले, ज्यात त्याने ‘#PrayforPalestine’ लिहिले आहे. यानंतर केराकतचे भाजप आमदार दिनेश चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘इरफान पठाण यांना इतर देशाबद्दल इतके प्रेम आहे, पण त्यांना आपल्याच देशातील बंगालवर ट्विट करता आले नाही.’

दरम्यान, कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे यामुळे कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीचा आधार घेत आमदार दिनेश चौधरी यांचे ट्विट शेअर केले.

यानंतर इरफानने कंगनाच्या इंस्टास्टोरीला उत्तर देत लिहिले, ‘माझी सर्व ट्विट माणुसकीसाठी किंवा देशवासियांसाठी आहेत. यात, सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोन आहे, ज्यांनी उच्च स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच वेळी दुसरीकडे मला कंगना, जिचे अकाऊंट द्वेष पसरवल्यामुळे निलंबित केले गेले होते आणि काही लोक जे पैसे घेऊन समाजात द्वेष पसरवतात, त्यांच्याकडून ऐकावे लागते आहे.’

महत्वाच्या बातम्या 

IMP