विजयस्तंभामुळे हिंदु आणि बौद्ध धर्मात वाद होत आहेत – अजयसिंह सेंगर

अजयसिंह सेंगर

मुंबई : भीमा-कोरेगाव येथे असलेला विजयस्तंभामुळे हिंदु आणि बौद्ध धर्मात वाद होत आहेत. त्यामुळे समाजात तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी हा विजयस्तंभ नष्ट करावा, असे वक्तव्य महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी केले.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत प्रचंड नुकसान होऊन २ जणांचा नाहक बळी गेला. पेशव्याच्या विरुद्धच्या युद्धात इंग्रजाना साथ देणारे देशद्रोही आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने असलेला विजयस्तंभ स्मारकावर सरकारने त्वरित बुल्डोझर फीरवावे, अशी मागणी महाराणा प्रताप बटालियन या हिंदू संघटनेने राज्य सरकारकड़े केली आहे. ज्या इंग्रजानी आपल्याला गुलाम केले.

आपले अतोनात हाल करत स्त्रिया, बालकांवर अत्याचार केले त्याच इंग्रजांच्या बाजूने उभे राहून लढा देण्यात कोणते ‘शौर्य’ आहे ,असा जाबही त्यांनी विचारला. पेशवे व देशातील जनतेनी क्रांतिकारकानी देशास स्वातंत्र मिळावे म्हणून इंग्रजाविरुद्ध लढले काही क्रांतिकारकानी प्राण अर्पण केले.

त्या क्रांतिकारकाचा अपमान करु नये म्हणून या पुढे भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारीस शौर्यदिनास परवानगी देऊ नये, असेही अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे.