वादग्रस्त ट्विट करणाऱ्या ओली रॉबिन्सनचे भारताविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन

मुंबई : पुढील महिन्यात भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला या सामन्यापासून सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ चांगली सुरुवात करण्यास उत्सुक आहेत.

भारताविरुद्धच्या मालिकेद्वारे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन पुनरागमन करणार आहे. गेल्या महिन्यात न्युझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याने काही वर्षापुर्वी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे त्याच्यावर कारवाई करत त्याला पदार्पणाच्या सामन्यानंतर निलंबीत करण्यात आले.

यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर ८ सामन्याची बंदी घातली होती. तसेच त्याला २.८३ रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. भारताविरुद्धच्या मालिकेपुर्वी त्याचे हे निलंबन संपुष्टात येत असल्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यात संघात स्थान देण्यात आले आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडुन पदार्पण करणाऱ्या ओली रॉबीन्सनने पदार्पणातच ७ गडी बाद करत सर्वाचे लक्ष वेधुन घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP