fbpx

जाट,पाटीदार,मराठा समाजाचे निघणारे मोर्चे म्हणजे आरक्षण रद्द करण्यासाठी सुरु असलेलं कारस्थान ; कसबे

maratha-morcha

जाट,पाटीदार,मराठा या त्या त्या प्रांतात संख्येने सर्वाधिक असलेली जाती आज आरक्षण मागत आहेत.सध्याचे आरक्षण रद्द करण्यासाठीचे कारस्थान असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी रविवारी व्यक्त केले.कसबे यांच्या या विधानावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दुसऱ्या बाजूला मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे म्हणजे आरक्षण रद्द करण्याचं कारस्थान कसं करू शकतो असा सवाल मराठा महासंघाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी उपस्थित केला आहे .

सुगावा प्रकाशनतर्फे देण्यात येणारा सुगावा पुरस्कार यंदा लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांना कामगार कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला . जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर , सुगावा प्रकाशनचे विलास वाघ , जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .

कसबे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

जाट,पाटीदार,मराठा ही त्या त्या प्रांतात संख्येने सर्वाधिक असलेली जात आरक्षणासाठी उठल्या आहेत. मात्र आरक्षण कशासाठी हे कोणालाच माहित नाही.सध्याचे आरक्षण रद्द करण्यासाठीचे कारस्थान आहे. जातीयवादामुळे देश अराजकतेच्या उंबरठ्यावर आहेयेणाऱ्या काळात जातीच्या आधावर कत्तली होतील अशी चिंता देखील व्यक्त केली.सध्याचे सरकार अराजकता थांबवू शकत नाही. धर्मचिकित्सा ही काळाची गरज आहे त्याशिवाय प्रबोधन चळवळ सुरू होणार नाही आणि त्याशिवाय परिवर्तन घडणार नाही.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सामन्वक शांताराम कुंजीर यांची प्रतिक्रिया
मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे . आम्ही आरक्षण मागत आहोत म्हणजे इतरांचं आरक्षण रद्द करण्यासाठीच कारस्थान करत आहोत हे जे वक्तव्य कसबे यांनी केल आहे त्यात तथ्य नाही .जातींच्या कत्तली होणार नाहीत मात्र आरक्षण न मिळाल्यास भविष्यात आगडोंब उसळू शकतो त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल .