पुणे : क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे हुतात्मा गेले त्या शहीद दिनानिमित्त पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानादरम्यान बोलत असतांना वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी महात्मा गांधीं संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. महात्मा गांधी यांच्या अहिंसावादामुळे नाही तर क्रांतिकारांमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे बंडातात्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात होण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
यावेळी बोलत असतांना बंडातात्या म्हणाले की,‘भगतसिंग यांनी केलेली क्रांती ही अभूतपूर्व असून सुरुवातीला त्यांच्यावर महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींचा अहिंसावाद त्यांच्या मनामध्ये ठासवला होता. परंतु भगतसिंग यांचा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. १९२२ ला एक हत्याकांड झाले, त्या हत्याकांडात त्याला समर्थन देण्यात महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा भगतसिंग महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही ही पक्षपातीच आहेत’, असे कराडकर म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भगतसिंग यांच्या मनावर परिणाम झाला, की आता या म्हाताऱ्याच्या ‘या’ मार्गाने जायचे काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. हे उपयोगाचे नाही, कारण लोकमान्य टिळकांचे एक वाक्य आहे. या म्हाताऱ्याच्या पद्धतीने जर स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर एक हजार वर्षे लागतील. शेवटी आपल्याला हे माहीत आहेच १९४७ साली आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेले नाही.’
महत्वाच्या बातम्या
- क्रिकेट जगत आश्चर्यात! बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिका संघाचा पत्ता साफ; ऐतिहासिक मालिकाविजय
- “..यालाच मोदी सरकारची मुत्सद्देगिरी म्हणायचे काय ?”- संजय राऊत
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ३१ मार्चपासून निर्बंधमुक्त देश
- ‘…ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत” – राऊतांची फटकेबाजी
- रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा!