भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे, मुस्लीम धर्मियांविरोधात केले वादग्रस्त वक्तव्य

bjp-flag-representational-image

टीम महाराष्ट्र देशा : सत्ता आल्यापासून अनेक भाजप नेते आणि कार्यकर्ते धार्मिक वादास कारण ठरत आहेत. आता आणखी एका भाजप नेत्याने बेलगाम वक्तव्य करून मुस्लीम धर्मियांना लक्ष केल आहे. उत्तरप्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.

सुरेंद्र सिंह म्हणाले की, मुस्लिमांमध्ये 50 बायका केल्या जातात आणि 1050 मुलं जन्माला घातली जातात होतात हे परंपरा नसून प्राण्यांची वृत्ती आहे. सुरेंद्र सिंहांच्या या बेलगाम वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी ही सुरेंद्र सिंह यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे सुरेंद्र सिंह सारखे नेते भाजप श्रेष्ठींसाठी डोके दुखी ठरत आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार भाजपच्या वाचाळवीरांना तोंडावर ताबा ठेवण्याची सक्त तकीद दिली आहे. तरी देखील भाजपचे वाचाळवीर आणि कार्यकर्ते आपल्या कृतीतून पक्षाला धोक्यात आणत असून समजात धार्मिक वाद निर्माण करत आहेत.