मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य; थोड्याच वेळात नारायण राणे अलिबाग पोलिसांसमोर होणार हजर

नारायण राणे

मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर या प्रकरणात राणे आज दुपारी १ वाजता अलिबाग गुन्हे शाखेत हजर राहणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार नारायण राणे अलिबाग गुन्हे शाखेसमोर हजर होत आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

राणे हे मुंबईतील जुहू येथील निवासस्थानाहून अलिबागच्या दिशेने रवाना झालेत. दुपारी एक वाजेपर्यंत ते अलिबागमध्ये पोहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.

राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी अटक झाल्याच्या दिवशीच रात्री जामीन मंजूर करताना महिन्यात दोनवेळा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. परंतू मागील वेळेस नारायण राणे यांनी प्रकृतीचे कारण देत हजेरी लावली नव्हती. आज सोमवारी मात्र नारायण राणे अटक आणि सुटका प्रकरणानंतर पहिल्यांदाच पोलिसांसमोर हजेरी लावणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर केला होता. नारायण राणे चौकशीला सहकार्य करतील, अशी माहिती नारायण राणे यांचे वकिल संग्राम देसाई यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :