श्रीपाद छिंदम तृतीय पंथीयाच्या रूपात; शिवसेनेन उभारला कल्याणमध्ये देखावा

शिवजयंतीनिमित्त कल्याणमध्ये देखावा

टीम महाराष्ट्र देशा: तिथीनुसार आज शिवसेनेकडून राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. याच दरम्यान कल्याणमध्ये असणाऱ्या रामबाग शाखेच्या वतीने वादग्रस्त देखावा उभारण्यात आला, ज्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला तृतीय पंथीयाच्या रुपामध्ये दाखवण्यात आल होते. दरम्यान, पोलिसांकडून हा देखावा काढून टाकण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

मागील महिन्यात अहमदनगर महापालिकेतील भाजपचा माजी उपमहापौर छिंदम यानं शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याचे प्रकरण चांगलेच तापले होते. सध्या या प्रकरणी छिंदमची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. याच घटनेचा निषेध म्हणून रामबाग शिवसेना शाखेच्या देखाव्यात छिंदमला तृतीय पंथीयाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. तसेच देशाबद्दल अनुद्गार काढणारे निलंबित काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर, सैनिकांबद्दल गैरशब्द वापरणारे भाजपा आमदार प्रशांत परिचारक, भाजपाचे खासदार नेपाल सिंह यांचेही पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

You might also like
Comments
Loading...