बजेटमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवा! भारताच्या तेल मंत्रालयाची मागणी

petrol pump

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या बजेटमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवावे. तसेच पेट्रोल व डिझेलचे भाव आटोक्यात रहावेत यासाठी एक्साइज ड्युटी कमी करावी. अशी मागणी खुद्द भारताच्या तेल मंत्रालयानेच केली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

यावर्षी अर्थ संकल्पात काय असावं किंवा काय नसाव याकडे सामान्याच लक्ष लागलेलं आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल व डीझेल चे भाव आभाळाला भिडले आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थ संकल्प महत्वाचा मनाला जातो. कारण महागाई नियंत्रित राहावी म्हणून भाजप प्रयत्नशील असेल. पेट्रोल व डिझेलचे यांचे भाव वाढले तर त्याचा परिणाम अन्य दरांवर होतो. त्यामुळे तेल मंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. इंधन सर्वाधिक महाग असलेल्या दक्षिण आशियाई देशांमध्ये भारत अग्रस्थानी आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या भावाने ८० तर डिझेलही प्रति लिटर ६७ रुपयांच्या पुढे आहे. गेल्या काही दवसात इंधनाचे सर्वाधिक उच्च दर होते. आम्ही असा केवळ प्रस्ताव देऊ शकतो. निर्णय अर्थ खाते घेईल तेल मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.