नाशिकमधील ठेकेदार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात 

नाशिक : मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते व नोदंणीकृत ठेकेदारांचे कोटयवधींचे धनादेश वठत नसल्याने, ठेकेदारांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांची कालभेट घेतली. ठेकेदारांनी जिल्हा परिषदेच्या बँकेतील अनामत रकमेतून आमची थकीत रक्कम देण्याचा पर्याय सुचविला. मात्र, मीना यांनी तो फेटाळल्यामुळे ठेकेदारांनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उचलण्याचा पवित्रा घेतला आहे.

जिल्हा ठेकेदार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मीना यांची भेट घेत चर्चा केली. ठेकेदारांचे अडकलेले ३५ कोटींचे धनादेश वठत नसल्याप्रकरणी यावेळी चर्चा झाली. मागील महिन्यात केलेल्या आंदोलनाच्याप्रसंगी ५ सप्टेंबरपर्यंत रखडलेले रकमेच्या निम्मी रक्कम देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदारांना ही रक्कम देण्यात आली नसल्याचे ठेकेदारांनी सांगितले. यावर मीना यांनी ठेकेदारांनाच सुनावत मला याप्रकरणात टार्गेट का करता अशी विचारणा केली. जिल्हा बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करा, असे सुनावले. याबाबत लवकरच बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे शशीकांत आव्हाड यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...