शिवाजी पार्कात ठेकेदारांच्या माणसांचा दारु पिऊन गोंधळ

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये महापरिनिर्वाण दिनासाठी येणा-या अनुयायांची व्यवस्था करणा-या ठेकेदाराच्या माणसांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे आढळून आले. शिवाजी पार्क येथे येणा-या अनुयायांची राहण्याची व्यवस्था पालिका कर्मचारी आणि ठेकेदार करत असतात.

मात्र, यावेळी ठेकेदारांची माणसे मदत करण्याचे सोडून दारू पित असल्याचे फेसबुक लाईव्हमध्ये दिसून आले. विकास रोडे आणि सागर झेंडे या तरुणांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही बाब समोर आणली आहे.

यात पालिकेच्या ठेकेदारांनी काम करण्यास नेमलेले कर्मचारी शिवाजी पार्क मैदानात दारु पित होते. विकास आणि सागर पहार मागण्यासाठी गेले असता त्यांच्यासमोर हा प्रकार आला. याबद्दल कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उलट सागर आणि विकासला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले.