स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यक – बद्रीनारायण बलदवा

सोलापूर : स्वप्ने पाहिल्याशिवाय ती पूर्ण होणार नाहीत. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते, असे प्रतिपादन बद्रीनारायण बलदवा यांनी केले. बद्रीनारायण बलदवा, त्यांच्या पत्नी पुष्पा बलदवा आणि त्यांची अवघ्या नऊ वर्षांची नात निशी यांनी मुंबई ते लंडन असा प्रवास चार चाकी गाडीने पूर्ण करत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद केली. याबद्दल सोलापूरकरांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आयपीसीसी भारतात १९ वा आलेला भाविन चौधरी याचाही सत्कार झाला. भाविन चौधरी याला सन्मानचिन्ह, २१ हजार रुपये, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर बलदवा यांनी मुंबई ते लंडन प्रवासातील विविध अनुभव सांगितले.Loading…


Loading…

Loading...