‘कंटेंट वल्गर होता पण कायदेशीर भाषेत…’ ; राज कुंद्राच्या वकीलांचं पहिलं स्टेटमेंट समोर

lundra

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आयपीसी कलमांसोबतच आयटी अॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67A हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांदा गुन्हा केला असेल तर 3 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आकारला जातो. एकाच व्यक्तीने दुसऱ्या वेळीही तोच गुन्हा केल्यानंतर तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड आहे. तर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास 7 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची तरदूत आहे.

या प्रकरणात राज कुंद्रा यांना 3 वर्षांसाठी तुरुंगात जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असा अंदाज कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सध्या राज कुंद्राला कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्राच्या वकिलाचं स्टेटमेंट समोर आला आहे. कंटेंट वल्गर होता पण कायदेशीर भाषेत त्याला अश्लील म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद वकीलांनी केला आहे. तसेच तो कंटेट पॉर्न कॅटेगरीत येत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. मंगळवारी राजच्या वकिलांनी कोर्टात त्यांची बाजू मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP