Lemon Water | दररोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पोटाच्या ‘या’ समस्या होतील दूर

Lemon Water | टीम महाराष्ट्र देशा: लिंबू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी, अँटीऑक्सिडेंट, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, प्रोटीन इत्यादी पोषक घटक आढळून येतात. या पोषक तत्त्वांच्या मदतीने शरीराची प्रतिकारशक्ती वाढू शकते. उन्हाळ्यामध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. पोट दुखणे, ऍसिडिटी, बद्धकोष्टता, पोट फुगणे इत्यादी समस्यांवर लिंबू पाणी एक रामबाण उपाय ठरू शकतो. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पुढील पोटाच्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

गॅस (Gas-Lemon Water Benefits)

पोटात गॅस होत असेल तर लिंबू पाणी त्याच्यासाठी एक रामबाण उपाय आहे. लिंबू पाण्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड आढळून येते, जे गॅसची समस्या दूर करण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये गॅसची समस्या निर्माण झाल्यास तुम्ही दिवसभरात दोन ग्लास लिंबू पाण्याचे सेवन करू शकतात.

बद्धकोष्टता (Constipation-Lemon Water Benefits)

लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. उन्हाळ्यामध्ये एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने पोट दुखी, ऍसिडिटी, आंबट ढेकर इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. त्यामुळे दररोज लिंबू पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

जुलाब (Diarrhea-Lemon Water Benefits)

उन्हाळ्यात पाण्याच्या अभावामुळे जुलाबाची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर या ऋतूमध्ये अन्न नीट पचत नाही, त्यामुळे पोट दुखी आणि जुलाब यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज लिंबू पाण्याचे सेवन करू शकतात. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने जुलाबाची समस्या दूर होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये लिंबू पाण्याचे दररोज सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर कोमट पाण्यासोबत बडीशेप आणि धने पावडर चे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पचनक्रिया सुधारते (Improves digestion-Fennel And Coriander Powder Benefits)

बडीशेप आणि धने पावडरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी कोमट पाण्यामध्ये बडीशेप आणि धने पावडरचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. या पाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टता, गॅस, ऍसिडिटी, पोट दुखी आणि जुलाब यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

हृदय निरोगी राहते (The heart remains healthy-Fennel And Coriander Powder Benefits)

बडीशेप आणि धने पावडर या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात. अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करतात. बडीशेप आणि धने पावडरचे एकत्र सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Fennel And Coriander Powder Benefits)

बडीशेप आणि धने पावडरमध्ये अँटिइफ्लिमेंटरी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म हाडे आणि सांधेदुखीच्या समस्यांवर मात करू शकतात. बडीशेप आणि धने पावडरमध्ये कॅल्शियम देखील आढळून येते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. कोमट पाण्यामध्ये बडीशेप आणि धने पावडर मिसळून प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version